नमस्कार! तुमच्या बद्दल थोडी माहिती सांगा. बखर साहित्याची काय आहे?
बखर हा ऐतिहासिक शब्द असून त्याचा शब्दशः अर्थ पूर्वीच्या काळात राजे महाराजे ह्यांच्या जीवणातीच महत्वाच्या घटना, गोष्टी एका रोजनिशी प्रमाणे नमूद करून ठेवणे असे सांगता येईल.. त्या बखरीं चा संदर्भ घेऊन जशे लेखक इतिहासकार आपली पुस्तकं लिहितात, माहिती इतरांपर्यंत पोचवतात, त्याच बखरी प्रमाणे आम्ही मराठी साहित्य सगळ्यांपर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू ह्या उद्धेशाने सुरू केलेली ही 'बखर साहित्याची'..
तुम्हाला ह्या उपक्रमाबद्दल कसे सुचले?
नेहमी मनात असायचं की जोड व्यवसाय हा हवा, कॉर्पोरेट मध्ये काम करत असलो तरी वाटायचं त्या सोबत जोडीला काहीतरी हवं ज्याने सतत ची वाटत असलेली पोकळी भरून निघेल. पुस्तकं वाचण्याची आवड ही होतीच त्यात भर पडली ती लॉकडाऊन मध्ये मिळालेल्या सवडीची, त्या काळात बरीच पुस्तकं वाचून झाली आणि आम्ही आजू बाजूला राहत असल्यामुळे पुस्तकांची देवाण घेवाण सुरू होतीच. लॉकडाऊन थोडं शितील झाल्यावर आम्ही पुस्तकं घेण्यासाठी दादरला जाऊ लागलो, पण ते खूप कंटाळवाणं आणि अडचणीचं होत होतं ह्याची दहिसर बोरिवली करांना नक्कीच कल्पना असेल. हळूहळू वाढत गेलेल्या पुस्तकं वाचण्याची गोडी खरतर आम्हाला ह्या कल्पनेकडे घेऊन आलिऊ आणि आम्ही मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचवायचा निर्णय घेतला, एका पुस्तका साठी होणारी ओढाताण नक्कीच इतरांना ही होत असेल हे गृहीत धरून आम्ही तिघांनी 'बखर साहित्याची' सुरुवात केली.
तुम्ही तिघे जण सुरुवाती पासूनच एकमेकांना ओळखता की ह्या उपक्रमामुळे तुमची ओळख झाली?
हो, आम्ही तिघे बालमित्र, शिक्षण एकाच शाळेत, वर्गात झाले आणि एकत्र करियर ची सुरुवात ही झाली. जवळपास २८ वर्षे एकमेकांना ओळखत असल्यामुळे नवीन व्यवसाय एकत्र करू असं ठरलं.
बखर साहित्याची उपक्रमाला किती वर्षे पूर्ण झाली?
तशी ह्या उपक्रमाची सुरुवात एप्रिल २०२२ पासून झाली होती पण "बखर साहित्याची" म्हणून आमची खरी ओळख नोव्हेंबर २०२२ मध्ये दिवाळी दरम्याने साजरा होणारा दहिसर रिव्हर फेस्टिवलला झाली. येथेच आम्ही पहिल्यांदा स्टॉल लावला.
"पुस्तक विक्री खूपच कमी होत चालली आहे आणि लोकांना वाचायला अजिबात आवडत नाही!" हे आपण सगळे वारंवार ऐकतो. ह्या धर्तीवर तुमचा हा उपक्रम खरखरच स्तुत्य आहे. हे सुरु करताना काय अडचणी आल्या?
सुरुवातीला आम्हालाही असंच वाटत होते की वाचक वर्ग दिवसेंदिवस कमी होत चालला आहे, पण जेव्हा आमची वाचनाची गोडी वाढली तेव्हा हळू हळू समजलं की पुस्तकांची उपलब्धी आजूबाजूच्या भागात खूप कमी आहे आणि पुस्तकांसाठी मुंबई मध्ये फार कमी दुकाने उपलब्ध आहेत. आमच्याप्रमाणे इतरही वाचकांना हि समस्या येत असेल असं वाटलं. सुरवातीला अडचण म्हणजे आम्ही ह्या क्षेत्रात नवीन अहोत. पुस्तकं कुठून घ्यायची कशी उपलब्द करायची ह्या बद्दल फारच कमी माहिती होती.. प्रकाशकांना संपर्क करणं, त्यांना भेटून आमचा उपक्रम समजावणे सुरुवातीला थोड्या समस्या आल्या, बऱ्या पैकी प्रकाशक विद्येची मायानगरी समजली जाणारे शहर पुणे इथे उपलब्ध आहेत व त्यांना एकाच ठिकाणी भेटणे शक्य होते त्यामुळे काही गोष्टी सोयीस्कर ठरल्या.
मराठी पुस्तके लोकांना वाचायला मिळावी ह्यासाठी तुम्ही घेतलेली मेहेनत आणि खरोखर झालेली पुस्तक विक्री ह्यात काही तफावत आहे की तुम्ही समाधानी आहात?
सध्याच्या परिस्थितीत कोणी म्हटलं की मी समाधानी आहे तर ते वावगं ठरेल असं मला वाटतं. पण असमाधानी असं बिलकुल म्हणता येणार नाही. आमची सुरुवात आम्हाला वाचनासाठी हव्या असणाऱ्या पुस्तकांसाठी करावी लागणाऱ्या कसरतीतून झाली. आम्ही पुस्तकं उपलब्ध करून देण्याचे ठरविले. समाधान फक्त एका गोष्टीचं नाही ते म्हणजे, वाचकांना हवी असलेली सगळीच पुस्तके आम्हाला उपलब्द करून देणे शक्य होत नाही, नक्कीच त्यासाठी आमचा १०० टक्के प्रयत्न सुरू आहे.. सगळी लोकं कौतुक करत आहेत, दैनिक दखल घेत आहेत आणि हो तुम्हांला ही आमच्या बद्दल जाणून घेण्याची उत्सुकता वेगळं मानसिक समाधान देत आहे आम्हाला. सर्वात मह्त्वाचं म्हणजे आर्थिक समाधाना पेक्षा वाचकांचं होणारं समाधान आमच्यासाठी खूपच प्रेरणादायी आहे.
वाचनाची आवड लावण्यासाठी काय केले पाहिजे असे तुम्हाला वाटते?
कोणत्याही गोष्टीची आवड निर्माण होण्यासाठी सुरूवात करणं खूप महत्वाचं असतं. वाचनाचीही आवड लागण्यासाठी त्याची सुरुवात करणे गरजेची आहे, आणि सुरुवात करताना एखाद्याला तशे पुस्तक सुचवण्याचा प्रयत्न आमचा असतो जेणेकरून सुरुवातीलाच वाचकाची हिरमोड होऊ नये.
तुम्हाला तिघांना वाचनाची आवड कधी पासून लागली?
अंकेश साटले: मला कॉलेज पासून पुस्तकं वाचण्याची आवड लागली, पण फार कमी. माझा इंग्रजी पुस्तक वाचण्याचा अट्टाहास असायचा, त्यात कॉमर्स मधून पदवी घेतल्या मुळे फायनान्स शी संबंधित पुस्तके वाचण्याचा प्रयत्न अधिक.. हळू हळू मराठी साहित्य वाचण्याची गोडी लागली त्यातल्या त्यात कथा कादंबरी वाचायला मला फार आवडतात.. तसेच सांगायचं झालं तर हल्लीच वाचलेली शरद तांदळे लिखील कादंबरी ' रावण '.
वैभव पाटील: लॉकडॉउन काळात महाभारत विषयावर आवड निर्माण झाली माहिती गोळा करताना खूप साऱ्या पुस्तकांची मदत भेटली. हळूहळू बाकी विषय आवडू लागले आणि वाचनाची भूक वाढत गेली.त्यातल्या त्यात म्हणायचे तर व पु काळे लिखित "वपुर्झा " हे पुस्तकं फारच आवडीचं झालंय.
राकेश म्हात्रे: कॉलेज मधे असताना हार्दिक नावाचा मित्र होता त्याला वाचनाची आणि भटकायची फार हौस. त्यानी वाचलेली पुस्तके आणि प्रवास आवर्जून तो आम्हा सर्व मित्रांना सांगायचं. त्यामुळेच पुस्तकं वाचण्याची आवड निर्माण झाली.कॉलेज मध्ये असताना पैसे कमी असायचे. त्यावेळी दादरला पुस्तकांचा सेल लागायचा ५० रुपयात कोणतंही पुस्तक मिळायच. मग आम्ही सर्व मित्र १-१ पुस्तक घेऊन ते एकमेकांना देवाण-घेवाण करून वाचायचो. तेहापासून बरीच पुस्तकं वाचली. विशेषतः ऐतिहासिक पुस्तकं वाचायला मला खूप आवडतात.
तुम्हा तिघांची सर्वात आवडती पुस्तके कोणती ?
राकेश म्हात्रे - शापित राजहंस, युगंधर, चेटकीण, पानिपत, तीन हजार टाके, राधेय वैभव पाटील - वपुर्झा, महाभारत, युगंधर, राधेय, दुर्योधन आणि इतर बरीच अंकेश साटले: द इंटेलिजेंट इन्व्हेस्टर, रिच डॅड पुअर डॅड, ययाती, असा मी असामी
लेखक आणि प्रकाशन संस्था ह्यांच्याशी तुमचा आलेला एखादा चांगला अनुभव ?
म्हटल्या प्रमाणे ह्या क्षेत्रात आम्ही नवीनच होतो. सुरुवातीला भिती आणि लाज पण वाटली. आम्हाला अजूनही आठवतंय सुरुवातीला दादर ला न्यू गणेश बुक डेपो आहे तिकडे गेलो. पण विचारणार कसं असं मनात असताना थोडं चाचपडतच शंकर दादांना विचारलं. पण त्यांच्या बोलण्यानं भिती निघून गेली. त्यांनी बरीच माहिती दिली तसेच स्वतः जाऊन प्रकाशकाना भेटण्याची कल्पना दिली आणि स्वतःचा नंबर देऊन कधीही काहीही मदत लागली तर बिंदास फोन करा असं सांगितलं. त्यांचे ते आश्वासक शब्द अजूनही आठवले की नवी प्रेरणा मिळते. जास्त वेळ वाया न घालवता आम्ही थोड्याच दिवसात पुणं गाठलं आणि ४-५ प्रकाशकांना भेटलो, त्यांनीही आम्हाला योग्य ते मार्गदर्शन केले. सुरुवातीला पैशाची अडचण होती. आम्ही प्रकाशकांना ऑर्डर पण कमी पुस्तकांच्या द्यायचो पण त्यांनी कधीही त्याबद्दल तक्रार केली नाही. बरेच लेखक स्टॉल वर येऊन आम्हाला भेटून गेले आजही येतात. त्यातील सुरुवातीच्या काळात लेखक उदय जोशी आम्हाला भेटले, आजही ते स्टॉलला भेट देऊन आपुलकीने चौकशी करतात आणि मार्गदर्शन सुद्धा.
तुमच्या स्टॉल वर सध्या किती पुस्तके आहेत? एका आठव्ड्यात साधारण किती पुस्तके विकली जातात?
सुरुवातीला ७०-८० पुस्तकांपासून आमचा प्रवास सुरू झाला पण सध्या आमच्याकडे ५००-५५० पुस्तकं आहेत. आम्ही आमची नोकरी सांभाळून हा उपक्रम राबवतो. त्यामुळे सध्या फक्त शनिवार आणि रविवार संध्याकाळी ५ तास आम्ही स्टॉल लावतो. पुस्तकं विकली जाण्याचं प्रमाण कमी जास्त असतं. तरी किमान १५-२० पुस्तकं विकली जातात.
नोकरी सांभाळून तुम्ही हा उपक्रम राबवत आहेत. ह्यातच तुमची वाचनाची असलेली मैत्री समजते. पण तरी ही तारेवरची कसरत होत असणार. कसं सांभाळून घेता ?
जेव्हा आम्ही हा उपक्रम सुरु केला तेव्हाच आमचं एकमत झालेलं की जर एखाद्याला एखाद दिवशी येणं शक्य नसेल तर त्याच्यावर कोणतीही बळजबरी नसावी. आणि खरं सांगायचं तर आमच्या ह्या प्रवासात सर्वात महत्वाची भुमिका आमच्या कुटुंबाची होती. सोमवार ते शुक्रवार नोकरी निम्मित बाहेर आणि शनिवार रविवार ह्या उपक्रमासाठी, म्हणजेच आठवड्याचे ७ हि दिवस आम्ही बाहेर असतो पण घरच्या मंडळींनी आम्हाला खूप सांभाळून घेतलं. वाचकांचा मिळणारा प्रतिसाद आणि प्रेमाचा वाटाही तितकाच महत्त्वाचा वाटतो.
ह्या उपक्रमाबद्दल जास्त लोकांना समजावे ह्यासाठी तुम्ही सोशल मीडियाचा वापर कसा करता ?
व्हॉट्सअँप बिझनेस आणि इंस्टाग्राम हे दोन प्लॅटफॉर्मवर सध्या आम्ही फोकस करतोय कारण सध्या हे दोन प्लॅटफॉर्म सर्वच वापरतात. व्हॉट्सअँप वर आम्ही आमची पुस्तकं, त्यांचे फोटो आणि पुस्तकाबद्दल थोडी माहिती अपलोड करतो. जेणेकरून वाचकांना पुस्तक कसे दिसते आणि कशाबद्दल आहे हे समजते आणि त्यांना योग्य ते पुस्तक घेण्यास मदत होते. इंस्टाग्रामवर आम्ही पोस्ट्स, स्टेटस आणि रीलस् अपलोड करतो जिथे आम्ही पुस्तकाला एखाद्या मॉडेल प्रमाणे दाखवतो. पुस्तकाचे फोटो, त्याची माहिती दाखवतो.
आजच्या युवा पिढीसाठी तुमचा संदेश.
आजचं युग हे डिजिटल आहे इथे सर्व गोष्टी एका क्लिक वर उपलब्ध होतात परंतु त्याचे काही दुष्परिणाम सुद्धा आहेत. याउलट जर आपण दिवसातून काही वेळ पुस्तकं वाचली तर त्याचे फायदे नक्की होतील. जे आम्ही स्वतः अनुभवले आहेत. या ऑनलाईनच्या जगात थोडं ऑफलाईन होऊया, कथा, साहित्याच्या आठवणीत पुन्हा रमूया...
वाचनाशी निगडीत कोणत्या नवीन उपक्रासाठी तुम्ही सध्या काही योजना आखल्या आहेत का ?
सध्या आमचीही नवीन सुरूवात आहे, आत्ता कुठे वाचकांचा प्रतिसाद बऱ्यापैकी मिळत आहे. पण भविष्यात नक्कीच काहीतरी नवीन करण्याचा विचार असेल, ज्याचा फायदा लहान मुलांपासून थोरल्यांपर्यंत सर्वांना होईल.
Innovating Reading and Taste on the Go! - ह्या ब्लॉग बद्दल दोन शब्द:
हे लिहिण्या पूर्वी तुमच्या ब्लॉग्स बद्दल थोडी फार माहिती घेतली, त्यात तुमचं पुस्तकांसाठीच असलेलं प्रेम जाणवलं प्रत्येक जण आपल्या परीने मराठी साहित्य लोकांपर्यंत पोहचवण्याचा, जपण्याचा प्रयन्त करत आहे ह्याचा खूप हेवा वाटतो.. तुम्ही सुरू केलेल्या ह्या उपक्रमासाठी खूप शुभेच्छा !!
तुम्हाला ह्या व पुढील प्रत्येक उपक्रमासाठी अनेक शुभेच्छा !
खूप खूप धन्यवाद. आपण सर्वांनी आमच्या ह्या उपक्रमाची दखल घेतलीत हि खरंच मोठी गोष्ट आहे. आपणा सर्वांची कौतुकाची थाप, मार्गदर्शन आणि प्रेम आम्हाला असच पुढे काम करण्याची ऊर्जा देतं राहील.
*******************************************************************************
Social Media Handles
WhatsApp - 9082675004

Instagram - bakhar_sahityachi